ज्या मो.ह.विद्यालयात आपली जडण घडण झाली त्या विद्यालयाच्या संबंधीत आठवणी ही आपली मर्मबंधातील ठेव आहे यात संदेह नाही. या आपल्या शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष २ नोव्हेंबर २०१६ पासून सुरु होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे.
२ नोव्हेंबर २०१६ रोजी सोहळ्याचा शुभारंभ होत आहे आणि वर्षभर या निमित्ताने विविध उपक्रम साजरे करावयाचे आहेत. यात आजी -माजी विद्यार्थ्यांबरोबर आजी- माजी शिक्षकही सहभागी होतील. हा महोत्सव वैभवशाली, आनंददायी तर व्हावाच पण तो अर्थपूर्ण ही व्हावा
असा आपला प्रयत्न असेल.
२ नोव्हेंबर २०१५ पासूनच माजी विद्यार्थ्यांशी संपर्क होत आहे. त्या वेळीही वृत्तपत्रातून आवाहन केले होते. विद्यालयाच्या संपर्क कक्षाकडे हजारो माजी विध्यार्थ्यानी नोंदणी केली आहे. Whats App, Facebook वर त्या त्या वर्षच्या विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार झालेले आहेत.
काळाबरोबर बदल होतच असतात. सर्वत्र इंग्रजी माध्यमाचा प्रभाव आहे मात्र समाजातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना अजूनही किमान खर्चात शिक्षण सुविधा मिळणे आवश्यक आहे.अक्षीकर यांनी संस्थेची स्थापना याच हेतुने केली आहे. संगणकासह सर्व आधुनिक सुविधा सध्या मो. ह. मध्ये शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आव्हान आता आपल्यासमोर आहे. वर्षभर साजरे करावयाच्या कार्यक्रमाचा खर्चही मोठा असणारच आहे. त्याच बरोबर विद्यालयाच्या व्यवस्थापनेचे संगणकीकरण, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, विविध क्रीडा प्रकारांची साधने-सुविधा निर्माण करणे, परदेशी भाषा शिकण्याची सुविधा , वैदिक गणित, विध्यार्थी व शिक्षकांचे उन्नतीकरण ह्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत.